Friday, July 20, 2012

पहाट झाली रवी निघाला उजळाया ह्या अवनीला 
नितळ स्तब्ध जल देई आरसा "बघ" म्हणुनी त्याला 

शिशिर धुके शिरशिरी अंगी परि निघती कामाला
तत्पर नाविक दक्षिण तीरी चुकती ना कर्तव्याला 

M. P. Thatte
11-07-2012

Photo: पहाट झाली रवी निघाला उजळाया ह्या अवनीला 
नितळ स्तब्ध जल देई आरसा "बघ" म्हणुनी त्याला  

शिशिर धुके शिरशिरी अंगी परि निघती कामाला
तत्पर नाविक दक्षिण तीरी चुकती ना कर्तव्याला

भूतान प्रदेशी ख़ुशी, कशी हा कुशी हिमालय देई 
नीरव प्रसन्न शीतल जल अन प्रसन्न वनराई 
कवण विराजे प्रासादी हे सौख्य कवण घेई?
सौंदर्य दिसे तव धरणीमाते हे ठायी ठायी 
M. P. Thatte
11-07-2012

Photo: भूतान प्रदेशी ख़ुशी, कशी हा कुशी  हिमालय देई 
नीरव प्रसन्न शीतल जल अन प्रसन्न वनराई 
कवण विराजे प्रासादी हे सौख्य कवण  घेई?
सौंदर्य दिसे तव धरणीमाते हे ठायी ठायी

अरे, हा तर पुण्याच्या तुळशी बागेचा फोटो...!!!!
नाही...
हा आहे स्पेन मधील एका बाजाराचा फोटो...

मनुष्यस्वभाव किती सारखा...!!! हव्यास किती तसाच...वैविध्य हवे...अगदी रोजच्या वापरातल्या वस्तूत सुद्धा. 

M. P. Thatte
11-07-2012

Photo: अरे, हा तर पुण्याच्या तुळशी बागेचा फोटो...!!!!
नाही...
हा आहे स्पेन मधील एका बाजाराचा फोटो...

मनुष्यस्वभाव किती सारखा...!!! हव्यास किती तसाच...वैविध्य हवे...अगदी रोजच्या वापरातल्या वस्तूत सुद्धा. 

आणि स्वभावातले वैविध्य? फार थोड्यांना मानवते ते. अन्यथा सम-स्वभावी मैत्रच दिसून येते. 

स्वभावातले वैविध्य असूनही मित्रत्व जुळायला अहंकाराला द्यावी लागते सुट्टी..दुस-याचं वेगळेपण, वेगळे गुण, वेगळ्या क्षमता या सा-याना "माझ्या" फुट-पट्टीने कसलं मोजायाचं...जिथे अधिक्य वाटेल त्याला दाद द्यावी..जिथे कमतरता वाटेल त्याला प्रोत्साहन द्यावे..

मित्रानो, मला तर आपल्या फेस-बुक वर सारे जण स्वभावातले वैविध्य जाणणारे, मित्रत्व जोपासणारे असेच आढळून आले आहेत.

राजा रवी वर्मा यांचे हे प्रसिद्ध चित्र...

ही सुवासिनी सांगते आहे........... 

एका ज्योति ने दूसरी ज्योत उजळता येते ,

थोड्या वेळाने कोणती कुणा मुळे उजळली ते सागता येत नाहीं

नाती तशीच उजळावित,

निरहंकारी, ज्योतिर्मयी

M. P. Thatte
11-07-2012

Photo: राजा रवी वर्मा यांचे हे प्रसिद्ध चित्र...

ही सुवासिनी सांगते आहे........... 

एका ज्योति ने दूसरी ज्योत उजळता येते ,

थोड्या वेळाने कोणती कुणा मुळे  उजळली ते सागता येत नाहीं

नाती तशीच उजळावित,

निरहंकारी, ज्योतिर्मयी
-----------------------------------------

राजा रवी वर्मा यांचे हे प्रसिद्ध चित्र...

ही सुवासिनी सांगते आहे........... 

एका ज्योति ने दूसरी ज्योत उजळता येते ,

थोड्या वेळाने कोणती कुणा मुळे उजळली ते सागता येत नाहीं

नाती तशीच उजळावित,

निरहंकारी, ज्योतिर्मयी
M. P. Thatte
11-07-2012

गोवर्धनगिरिधारीने ब्रजवासियांना सात दिवस इंद्राच्या प्रक्षोभापासून वाचवले ते ही गोवर्धन-शिला एका करांगुलीच्या आधारावर उचलून धरून असा श्रद्धावानांचा समज आहे.

हे चित्र त्या शिलेचे तर नाही...???
M. P. Thatte
11-07-2012

Photo: गोवर्धनगिरिधारीने ब्रजवासियांना सात दिवस इंद्राच्या प्रक्षोभापासून वाचवले ते ही गोवर्धन-शिला एका करांगुलीच्या आधारावर उचलून धरून असा श्रद्धावानांचा समज आहे.

हे चित्र त्या शिलेचे तर नाही...???

एक माड म्हणतो दुस-याला, वाकुन पाहू दूर जरा 
बघुया सागर जल हे कैचे भिडलेसे त्या अंबरा
रत्नाकर जल हसुनी वदले वेड्या माडानो आवरा 
कशास आहे कुतूहल तुमचे? क्षितीज असे मम उंबरा 

M. P. Thatte
11-07-2012

Photo: एक माड म्हणतो दुस-याला, वाकुन पाहू दूर जरा 
बघुया सागर जल हे कैचे भिडलेसे त्या अंबरा
रत्नाकर जल हसुनी वदले वेड्या माडानो आवरा   
कशास आहे कुतूहल तुमचे? क्षितीज असे मम उंबरा

हा घसरता रवी म्हणतोय......

रे जलधी मज नाही अवधी गांभीर्य तुझेच बघाया 
ही धरा पहा नित फिरत अशी तत्पर मज बुडवाया 

परी थांब रात्र उलटू दे ही येईन नव्या जोमाने 
स्पर्शून चरण सागरा तुझे जाईन याच मार्गाने 
M. P. Thatte
11-07-2012

Photo: हा घसरता रवी म्हणतोय......

रे जलधी मज नाही अवधी गांभीर्य तुझेच बघाया   
ही धरा पहा नित फिरत अशी तत्पर मज बुडवाया 

परी थांब रात्र उलटू दे ही येईन नव्या जोमाने  
स्पर्शून चरण सागरा तुझे जाईन याच मार्गानेPhoto: हा घसरता रवी म्हणतोय......

रे जलधी मज नाही अवधी गांभीर्य तुझेच बघाया   
ही धरा पहा नित फिरत अशी तत्पर मज बुडवाया 

परी थांब रात्र उलटू दे ही येईन नव्या जोमाने  
स्पर्शून चरण सागरा तुझे जाईन याच मार्गाने