Tuesday, August 9, 2022

माझा निथंबता ओलेता पारिजात नुसता पाऊस झेलत होता.
सकाळ झाली पण सूर्याला पण झाकोळून टाकणारे घनमेघ त्याला धूसर करत होते.
पाऊस काही संपेना.... वारा पण थकून गेलेला वाटला. किती किती फुले वा-याने भुईवर अंथरली पण माती तरी किती पाणी शोषून घेणार? अखेर फुले जमली साठलेल्या पाण्यावरच
पण फुलांचा ताजेपणा अजून शिल्लक होता
छत्री घेऊन मी देवासाठी त्यातली भाग्यवान फुले वेचू लागलो.. भाग्यवानच नाही का? चिखली पाण्या ऐवजी माझ्या देवघरात देवापाशी ती जाणार होती.
सोनटक्का म्हणाला, मला उचल... लालेलाल जास्वंद म्हणालं मला उचल... नाजुकशी जुई पण तेच म्हणाली..अबोली बोलली नाही पण बहुधा तेच होतं तिच्या मनात.
मी सर्वांना सांगितलं... पारिजात उचलली कारण ती झाडावर नव्हती. तुम्ही आहात तिथेच सुंदर दिसता...तुम्हाला तोडून काय होईल...सगळी उद्या निर्माल्य व्हाल ...चालेल?
एकमुखाने उत्तर आलं "नको नको"
माझ्या मनात कुठेतरी देवाचाही आवाज आला..."अरे मी काय फक्त तुझ्या देवघरातच आहे का?"
मधुसूदन थत्ते
०९-०८-२०२२






No comments: