Friday, May 4, 2012

वृक्षराज, ह्या वसुंधरेने भव्य पोसिले तुवा 
उंचीचा उच्चांक घडवितो का रे तू इक नवा? ||

परि हे नच आवडे क्षुद्र ह्या वृत्तीच्या मानवा 
म्हणे मनी लाकुड अति सुंदर कापुनी टाकावा ||

चढे वरवरी पडे कसा जणु किडा सरपटावा
अंती मग उद्देशां माणुस सफल मात्र व्हावा ||

मधुसूदन थत्ते
०१-०५-२०१२



वाटे मज बोलावि काल हा सातवाहनाचा
कालांतर करुनी निर्णय केला लगेच जाण्याचा ||

पद्मपाणि की वज्रपाणि तू देव तरि कुणाचा ?
हे चित्र नव्हे निश्चीत असा हा तूच असशी साचा ||

बौद्ध काळ तो असे कलांच्या उदंड समृद्धीचा
सांगा कुणितरि मार्ग मला त्या काळीं जाण्याचा ||

(dedicated to immortal paintings of Ajintha)

मधुसूदन थत्ते
०२-०२-२०१२




घेते मी ताई तुझ्या मनीचा ठाव
कवितेत तुझ्या हे कसे ग सुंदर भाव ||

वाटते भाव-विश्वात एकरुप व्हावं
कल्पनात तुजसे समरस होऊन जावं ||

शब्द-ब्रह्माही संभ्रमात टाकावं
ह्या कोमल मृदू कवितेला तूच लिहावं
कोमल तुज पाहुनि काव्यचि हे लाजावं ||

(Dedicated to sensitive young poets)
मधुसूदन थत्ते
०१-०५-२०१२
 —



जपमाळ हाति तव बघुनि चकित जन झाले
कोवळे वय असे वैराग्य तुवा का आले? ||

षड्रिपू भाव तुज स्पर्शुन कधी ना गेले?
सात्विक तेजाचे वलयहि दिसु लागले ||

निश्चयि मुद्रा तू ध्येय कठिण योजले
अनुकरण करावे असे वाटु लागले ||


(Dedicated to every countenance having “Satvik” bhava)

Madhusudan Thatte
29-04-2012
 —


सन १९५३. माझी शाळा Robert Money School .
दादर-GranTरोड नित्याचा प्रवास....

८ वी ची वार्षिक परीक्षा...भूमिती (Maths )चा पेपर just सुरु होणार.... 

माझ्या लक्षात आले कंपास box घरीच विसरलो...त्यात सगळेच..पेन-पेन्सिल सुद्धा...

रडवेला झालो..वर्गावर आमच्या उजगरे बाई होत्या...त्याना सांगितले, त्यांनी त्यांचे पेन दिले पण पुढे काय ?

काही सुचेना.डोळे मिटून बसलो इतक्यात बाईंचा डोक्यावर हात फिरला...त्यांच्या हातात माझीच...हो...माझीच कंपास box होती...

"घे आई आली होती तुझी द्यायला...आता शांत मनाने पेपर लिही"

मी चमकून दाराकडे पाहिले...हो आई होती तिथे आणि माझ्याकडे जरा पाहून हसून… गेली की...!!! तिला आत प्रवेश नव्हता...

मन चक्रावले...दादरहून आई आली...!!!! अगदी वेळेवर....देवासारखी...
गळ्यात जडपणा आला...डोळे पाणावले...

असे म्हणायला हवे होते ना....."आई...तू धन्य आहेस...मातृदेवो भव" ..नाही सुचले...लहान होतो ना?

मित्रानो, असे आनंदाश्रू आणि अशा कोवळ्या वयात तुम्हीही कदाचित अनुभवले असतील...कदाचित हे आनंदाश्रू...असा गळा जड होणे नंतरच्या आयुष्यात अनुभवला असेल...

सांगा तुमचे अनुभव...



M. P. Thatte 25-04-2012
स्वप्नात पाहिले तू तुजला ह्या गुलाब शैय्येवरी
सत्यात असे अनुभवास यावे ही इर्षा तव उरी ||

बाबा आई सतत छत्र तुज लाभे आजवरी
ते छत्र नव्हे तर गुलाब शैय्या होती ती का खरी? ||

नित्याचे असते जे त्याची जाण नसे का खरोखरी?
स्वप्न-सत्य सीमारेषा तशि बारीक आहे खरी ||

गुलाब शैय्या, धरित्री शैय्या की ती काटेरी
इथुन पुढे हा मार्गक्रम गे तूची तू ठरवी ||



M. P. Thatte 23-04-2012


पाखरे जरी, गृहिणीच त्या घरट्या घरट्यातुनी 
वृक्षच मग हा गप्पा कट्टा मानति सा-या जणि |

भुर-भुर चिव-चिव सतत, जाति ना कधि त्या कंटाळुनी 
चिमुकली बाळे मागे आल्या सा-या जणि ठेउनी |

ढढाम ठोम, ढढाम ठोम भुई गेली हादरुनी
फटाकेच ते पाखरांस त्या आले ना समजुनी |

भुर्रकन गेल्या घरी आपल्या त्या सा-या पक्षिणि
बाळे झटकन ज्या त्या घरटी बसती बिलगूनी |

मधुसूदन थत्ते
२२-०४-२०१२



चंद्र मंद्र पाउली उपजला रत्नाकर उदरी 
शरद ऋतू पौर्णिमा प्रगटली वसुंधरे दारी
कानी आली लक्ष्मी पृच्छा प्रत्येकाच्या दारी 
धन देण्या आले मी बोला कोजागिरी? कोजागिरी?

चंद्रमौळि कुटिरेत उभी ही म्हातारी दारी
ज्येष्ठ कन्यका ओवाळाया येईल हो मम घरी
परि ज्येष्ठ कन्यका होती झाली देवाला प्यारी
लक्ष्मी वदली ही मी आली थांबशि तव दारी

मधुसूदन थत्ते
२१-०४-२०१२



फिरकी गिरकी हलकी फुलकी बाले तू दिसशी 
अजब तोल मार्दव शरिराचा अजबच सांभाळिशी 

माझेच रूप, प्राविण्य, कसब हे केवी तू मिळवीशी?
माझेच आजचे अपंगत्व परि ना कधी अनुभवशी 

(Dedicated to noble thoughts as this one)
M. P. Thatte.
17-04-2012



तेजस्विनी मी, मनस्विनी मी नाही मज शृंखला.....
अशी मी स्वाभिमानी बाला

मैत्रेयी अन गार्गी-अहल्या वेदकाल गाजवला 
जिजाबाई अन झाशी राणी इतिहासही केला.....
अशी मी स्वाभिमानी बाला

आनंदी अन रमा रानडे निवेदिता का भुलला?
सुसज्ज आणि सुविद्य मी स्वीकारीन अधुनिकातेला
अर्थशास्त्र, संगणीक ज्ञान मम साद अंतराळा.....
अशी मी स्वाभिमानी बाला

(Dedicated to all brave and intelligent women)
मधुसूदन थत्ते
१७-०४-२०१२



आयुष्याची सांज जसे ह्या दीपाचे मिणमिणणे 
करू हिशोबा जगण्याच्या ह्या स्वाभाविक वाटणे....1 

सुखदु:खाची गोळाबेरीज कधी नसावी उणे
उणे कशाला प्रयत्न व्हावा शून्यहि कधी नसणे....२ 

उणे काय अन शून्य काय, दोन्ही तर लाजिरवाणे
नव्या पिढीला आर्जव धरुनी हेची मम सांगणे....3

हा मार्ग पहा ठरविलेच याने क्षितिजावर जाणे
गुंज गुंज सुख-पुण्य घेउनी क्षितिजा तव गाठणे....४

मधुसुदन थत्ते
१५-०४-२०१२



परतल्या घरी हे गोधन चालुनी आले
शोधुनी मुरलिधर जीव कसे थकलेले 
नदि लांब राहिली मेघ आकाशी झुकले
घरि केडा-केडी वाट पाहुनी थकले 
असेल का त्यां चारा पाणी दिधले ? 
हर गाय म्हणे "बच्छड्या रे मी ही आले
हा पान्हा देण्या अधीर मन हे झाले"

पस. :(केडा-केडी असे वासराना हिंदीत म्हणतात)

मधुसूदन थत्ते
१५-०४-2012



युग-युगे जाती एकेक पडती हे खांब
मग अंत तुझा कलीयुगा, जरासा थांब
संहार जयाचे कार्य तोची हा सांब 
झिरपते पाणी हे थेंबावरती थेंब
ही पिंड बुडे आधि की कोसळतो खांब 
मग युगान्तरा सुरु करेल ही जगदंब 

(युगांत...एक निश्चित घटना )
मधुसूदन थत्ते
13 -०४-२०१२



घर म्हणते त्या आजोबाला मी तर होई उजाड 
तूच बांधले तूच कौतुके केले माझे लाड 
कारे गेले वैभव तुझे पार दृष्टीच्या आड?
चंग बांधुनी उभा होशि तू चिंता आता सोड


M. P. Thatte
13-04-2012




आजोबा...डोके सांभाळा...वरून कुंडी पडेल.


तो काळ अविस्मरणीय आहे मला. पाच वर्षाचा मी...पसतीसचे बाबा...माझ्या इवल्याशा भावनांचे सारे केंद्र म्हणजे बाबा...आई? नव्हती ती...मला तर आठवतच नाही ती. किती माया द्यावी बाबांनी...!!! आई नाही असे वाटू नये ना म्हणून केले का त्यांनी...नव्हे...त्यांचा पिंडच दयेचा-मायेचा. हळुवार शिस्त लावावी ती त्यांनीच. आमच्या गरजा कमी आणि म्हणूनच की काय सुख खूप..अगदी खूप...

आजचा काळ अविस्मरणीय कसा होणार बाबांना? ....अल्झायमर आहे त्याना...

पसतीसचा मी...पासष्ट्चे बाबा..बाबांच्या इवल्याशा भावनांचे सारे केंद्र म्हणजे मी. माझी पत्नी? खूप प्रेमळ आहे . घरी आहे. ती आता बाबांची आई आहे. किती माया द्यावी तिने त्याना....!!!! कोण जाणे ते आजच्या अवस्थेत तिला त्यांची आईच समजत असावेत. तिचा पिंडच दयेचा-मायेचा..हळुवार देखभाल करावी ती तिनेच. आजही आमच्या गरजा कमी आणि म्हणूनच की काय सुख खूप..अगदी खूप...

(dedicated to unfortunate Alzheimer patients)

मधुसूदन थत्ते
११-०४-२०१२



बाळा किती एक टक बघतोयस रे? 

मी नाही असे दृष्टीला दृष्टी देऊ शकलो उभ्या आयुष्यात...आता तुझ्याकडून, माझ्या पंतवाकडून, शिकणार आहे...

आणि कसला विचार चालू आहे तुझ्या मनात? 

हाच का की एक दिवस तुला माझ्यासारखे व्हायचे आहे?.....

आणि....

हाच ना की लवकरच मी तुझ्याच सारखा बाळ होऊन येणार आहे म्हणून?

(Dedicated to ailing great grandpas....)

मधुसूदन थत्ते
१२-०४-२०१२



PISA tower laments………
“I just mentioned to that famous London Tower…..I have Inclination and you have Time. Let people realize that if they have both they will create wonders….
This man seems to have heard it and got frustrated….
But does it mean he should knock me down? 
(Dedicated to PISA Tower)
Madhusudan Thatte
11-04-2012


नश्वर तर हा परिसर सारा 
दिसे मूर्ती ही, देव का खरा? 
परि नंदी जाणे परमेश्वरा 
मजहुनी नंदी श्रेष्ठ खरा


M. P. Thatte
10-04-2012


निष्पर्ण वृक्ष पाहुनी वाघुळे म्हणती अमुचे घर 
निशाचर अम्ही दिवसामाजी लटकण्यास तत्पर 
प्रतिकात्मक वाघूळ माणसा तव दुर्गुण भार 
निष्पर्ण वृक्ष तव प्रतिक झटक हे दुर्गुण तू सत्वर 

मधुसूदन थत्ते
०८-०४-2012


ENTRANCE AND PATHWAY TO MARYLAND UNIVERSITY.

A “student to be” pauses at this gate….fills her eyes with the beauty of the pathway and says…
……“Lead me to the boundaries of knowledge
……“Make me stretch my abilities to extremes
……“Arouse my confidence in rising degrees as I reach the destination
……“Dilute distractions, which entice me, to nothingness as the journey progresses”
Because….
My exit at the other end must see me as an asset to the world…..
-------------------------------------------------------------------------
By M. P. Thatte

07-04-2012


सौंदर्य वाटले गोळा करू जगताचे 
मम मातृभूमीवर ठेवू सजवुनी साचे 
सौंदर्य हे? नव्हे हे दुय्यम दर्जाचे
शारदा पुत्र आम्ही विद्या लेणे आमुचे 

मधुसूदन थत्ते
०६-०४-2012


नितळ आकाशी विरल मेघ हे असती 
कधी वाघोबा कधी ससा असे ते दिसती 
हे गोळा करुया इच्छा माझी होती 
मन मानीना, ती वेडी कल्पना होती !!!

Madhusudan Thatte 
06-04-2012


हे बघ...नीट ऐक...

मालकाचं पत्र तुला न्यायचे आहे...पत्ता ध्यानात ठेव ...

आणि हो त्या मालकाच्या प्रियेलाच दे फक्त...

मग तिथे थांब गुटूर्गु गुटूर्गु करत. कदाचित खूप वेळ लागेल पण थांब

मग ती प्रिया तिचे उत्तर देईल आणि म्हणेल..."कबुतर जा जा जा..."

मग भुर्रकन परत ये...

M. P. Thatte
05-04-2012


हसविशी आम्हा तू खदखदुनी 
जीवनी तुझ्या बघु डोकावुनी
होती कारे दु:ख तुझ्या मनी?
कशी ठेविशी तू ती लपवूनी? 

(dedicated to Charlie Chaplin)
Madhusudan Thatte 
04-04-2012


आई म्हणाली होती काहीही खात जाऊ नकोस, नीट तपासून खा.......


M. P. Thatte
10-03-2012


म्हणती मम पूल जरी..... 
Bridge म्हणतात कौतुकाने मला. नाव मोठे लक्षण खोटे. 
ह्या अथांग सागराला मी काय "Bridge" करू? मी तर साधा कठडा. 
पण वाटसरू माझ्यावर टेकतात. ह्या जलधीला डोळे भरून पहातात. आणि नकळत त्याच्याशी हितगुज करतात...
तेव्हा मात्र असतो मी "Bridge".... सागराच्या आणि वाटसरुंच्या मनांचा.


M. P. Thatte
12-03-2012
घुबडा घुबडा तव गुपित कळावे मजला 

अपशकुनी मग हे जन म्हणती जरी तुजला ||


इवलासा तर तू काय करसि मनुजाला? 

हां आनंदित होशी पाहुनि अंधाराला ||


शास्त्रज्ञा संशोधनी येशि मदतीला

ते "रडार" म्हणती तुझ्या तीक्ष्ण दृष्टीला ||

(dedicated to all hated birds )

मधुसूदन थत्ते

०४-०५-२०१२
वाटे मज बोलावि काल हा सातवाहनाचा
कालांतर करुनी निर्णय केला लगेच जाण्याचा ||

पद्मपाणि की वज्रपाणि तू देव तरि कुणाचा ?
हे चित्र नव्हे निश्चीत असा हा तूच असशी साचा ||

बौद्ध काळ तो असे कलांच्या उदंड समृद्धीचा
सांगा कुणितरि मार्ग मला त्या काळीं जाण्याचा ||

(dedicated to immortal paintings of Ajintha)

मधुसूदन थत्ते
०२-०२-२०१२
वृक्षराज, ह्या वसुंधरेने भव्य पोसिले तुवा 
उंचीचा उच्चांक घडवितो का रे तू इक नवा? ||

परि हे नच आवडे क्षुद्र ह्या वृत्तीच्या मानवा 
म्हणे मनी लाकुड अति सुंदर कापुनी टाकावा ||

चढे वरवरी पडे कसा जणु किडा सरपटावा
अंती मग उद्देशां माणुस सफल मात्र व्हावा ||

मधुसूदन थत्ते
०१-०५-२०१२

विसावलो मी येथे होतो समोर पट हा आयुष्याचा
पायाखाली पत्री माझ्या जणु दिन प्रतिदिन आयुष्याचा
हर दिन गळला ढळला सुकला ढीग उरे हा पाचोळ्याचा
प्रवास पुढचा एक दिनी मग बाक होई हा दुस-याचा
--------------------------------------------------------
विसावलो मी येथे होतो समोर पट हा आयुष्याचा 


पायाखाली पत्री माझ्या जणु दिन प्रतिदिन आयुष्याचा 


पाचोळा? नच, सोनेरी मम ठेवा अनुभूतीचा 


मी नसेन तरि हा अंश उरे तव मार्गदर्शनाचा 

मधुसूदन थत्ते
12-03-2012