Friday, May 4, 2012

स्वप्नात पाहिले तू तुजला ह्या गुलाब शैय्येवरी
सत्यात असे अनुभवास यावे ही इर्षा तव उरी ||

बाबा आई सतत छत्र तुज लाभे आजवरी
ते छत्र नव्हे तर गुलाब शैय्या होती ती का खरी? ||

नित्याचे असते जे त्याची जाण नसे का खरोखरी?
स्वप्न-सत्य सीमारेषा तशि बारीक आहे खरी ||

गुलाब शैय्या, धरित्री शैय्या की ती काटेरी
इथुन पुढे हा मार्गक्रम गे तूची तू ठरवी ||



M. P. Thatte 23-04-2012


No comments: