Wednesday, December 9, 2015

एका कवीने म्हटले होते...
"मला वाटते वेलीवरले व्हावे सुंदर फूल.."
जुनी आहे ही कविता...माझ्या बालपणाची....
कोण जाणे कुठे मिळेल पूर्ण...पण मिळो, न मिळो...त्या एका ओळीत खूप काही आहे विचार करायला...
===========================================
मित्रांनो,
असं "मला वाटते..." ह्या सदरात काय काय मनी आणता येईल, नाही का..??
हे क्षणिक सुख नव्हे...निरंतर सुख...पण अल्प काळाचे...
एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे..
"मुहुर्तम ज्वलितं श्रेय: नच धूमायितं चिरम..."
(वर दिलेले सुभाषित बरोबर लिहिले आहे ना?.Mandar Bhat)
कोण्या थोड्या काळासाठी अग्नी पेटून उठावा हे श्रेयाचे ..सदैव धूर येत रहाण्यापेक्षा
हे ते निरंतर सुख ..पण अल्प काळाचे...
मधुसूदन थत्ते
१७-०९-२०१४

3 comments:

Ajit said...

Trying to recollect the rest of this poem:

मला वाटते वेलीवरले व्हावे सुंदर फूल
सुगंध उधळित ज्याला त्याला पाडावी मी भूल
मला वाटते वृक्षाची घन शीतल छाया व्हावे
शिणलेल्यांना आरामाचे सौख्य जरासे द्यावे

Deepak said...

फार छान धन्यवाद.

अजून पुढच्या ओळी काय आहेत?

Deepak said...

सुंदर कविता आहे.
यावर गाणे आहे का?