Wednesday, August 6, 2014

मित्रांनो,
आज गुरुवार....त्रिगुणात्मक त्रैमूर्तीचे स्मरण...
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

कोण्या कवीने ह्या देवाचे वर्णन काय सुरेख केले आहे पहा...

हे छोटेसे भजन मी लहान असताना माझ्या काकांनी दर गुरुवारी म्हटलेले ऐकले आहे आणि पुढे मी म्हणत असे. भैरव रागात बांधलेलं हे भजन मी अजूनही पेटीवर वाजवत असतो...

वर्णन तर पहा...सोबतच्या चित्रात दत्तमूर्ती त्याच रूपात आपण पहावी...पूर्ण भजन स्कॅन करूनही दिले आहे खाली..(चित्र डॉ. दिलीप साठे ह्यांच्या बहुमोल ग्रंथातून घेतले आहे. ग्रंथाचे नाव आहे: "श्रीगुरुचरणतीर्थ")

हा परम सनातन विश्व भरूनी उरला
गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला

हा देवही आणि ऋषीही...कसा ते पुढे वाचा...

स्मित रम्य वदन, काषाय वसनधारी...
पीयूष युक्त करि रत्न जडित झारी...
निज भक्तत्राण कारणी शूल धरिला ...!!!!

पहा काय शब्द आहेत सुंदर...

पुढे कवी म्हणतो....

बांधिला टोप मुरडुनी जटा मुगुटी...
घातली दयाघन माला दिव्य कंठी
करधृत डमरूतुनि उपजति ज्ञानकळा...

किती अप्रतीम वर्णन केले आहे कवीने...!!!!

श्वानरूपी श्रुती आणि कलीला घाबरून जवळ असलेली भूधेनु... ह्या मृगचर्म पांघरलेल्या आणि हाती शंख चक्र असलेल्या भगवंतापाशी वावरत आहेत..

स्वजनांच्या रक्षणाला तत्पर अशा ह्या भस्म लेपलेल्या देवाच्या झोळीत जन्म-मरण पिगा घालतायत..युगे आली गेली...येणार जाणार...

अशा ह्या नारायणाच्या हृदयी भक्त-प्रेम रंग भरून-व्यापून उरला आहे....भक्तांनो...पहा..जरा ध्यान करा जरा...!!!!!!!!

मधुसूदन थत्ते....
०७-०८-२०१४
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

हा परम सनातन विश्व भरूनी उरला
गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला ||

बांधिला टोप मुरडुनी जटा मुगुटी...
घातली दयाघन माला दिव्य कंठी
करधृत डमरूतुनि उपजति ज्ञानकळा..
गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला ||

मृगचर्म पांघरी शंखचक्र हाती
श्रुती श्वानरूप घेउनी पुढे पळती
भूधेनु कलिभये चाटित चरणाला
गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला ||

करि स्वजन उपाधी भस्म लेप अंगा
झोळीत भरी तव जन्म मरण पिंगा
नारायण हृदयी रंग भरूनी गेला
गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला ||

◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

2 comments:

Unknown said...

शब्द अपुरे पडतात तुमचे आभार मानायला!मी लहानपणी हे भजन खूप ऐकले आहे.आज का कोण जाणे पण मला हे भजन खूप आठवत होतं पण सगळं आठवत नव्हतं.तुम्ही माझी तळमळ शांत केलीत!

Unknown said...

अजून एक विनंती आहे की जर चालीसकट पाठवू शकलात तर खूपच छान होईल