हा घसरता रवी म्हणतोय......
रे जलधी मज नाही अवधी गांभीर्य तुझेच बघाया
ही धरा पहा नित फिरत अशी तत्पर मज बुडवाया
ही धरा पहा नित फिरत अशी तत्पर मज बुडवाया
परी थांब रात्र उलटू दे ही, येईन नव्या जोमाने
स्पर्शून चरण सागरा तुझे जाईन याच मार्गाने
स्पर्शून चरण सागरा तुझे जाईन याच मार्गाने
मधुसूदन थत्ते
२८-०८-2012
२८-०८-2012
======================
ललत भटियार ...दुग्ध शर्करा योग....सकाळची गोड न्याहारी...
एकदा अशोक रानडे भीमसेनजींची मुलाखत घेत होते...पंडितजींच्या गायनाचे अनेक पैलू अलगद उलगडून मिळत होते..शेवट येत चालला....शेवटची भैरवी आता अशोकजी विचारणार हे नक्की..
अर्थात आता "जो भजे हरी को सदा... " हे अप्रतीम भजन पण ऐकायला मिळणार...
मी सरसावून बसलो...
अन अचानक भैरवी ऐवजी अशोकजींनी "आम्हाला ललत भटियार जरा ऐकवा" असे सुचवले...
मित्रांनो त्यादिवशी तरी अखेरची भैरवी ऐकली नाही हाचे वैषम्य वाटले नाही...इतकी अप्रतिम झलक अण्णांनी ऐकवली...
पण ती तर झलक...आता हे घ्या पूर्ण माप....!!!
मधुसूदन थत्ते
११-१०-२०१५
११-१०-२०१५
==================================
कौस्तुभ, बरे झाले आठवण करून दिलीस रविवार काव्य-वृत्ताची.
आज आपण पोस्टमन ह्या कवितेतली तीन वृत्ते पाहू...
आज आपण पोस्टमन ह्या कवितेतली तीन वृत्ते पाहू...
वसंततिलका
पायी तुमान चढवून सुरेख खाकी
बांधी रुमाल तसला अपुलेही डोकी
घालूनी कोट मग तो कमरेस पट्टा
सर्वात पोस्टमन हा उपयुक्त मोठा
बांधी रुमाल तसला अपुलेही डोकी
घालूनी कोट मग तो कमरेस पट्टा
सर्वात पोस्टमन हा उपयुक्त मोठा
दिंडी
किती पत्रे हो असती याजपाशी
कुठे कवणाची माहिती तयाशी
क्रमे लावुनि फिरण्यास तो निघाला
मोद वाटे पाहुनी दूर त्याला
कुठे कवणाची माहिती तयाशी
क्रमे लावुनि फिरण्यास तो निघाला
मोद वाटे पाहुनी दूर त्याला
मालिनी
झरझर पथ चाले सारखा नित्य नेमे
घरि घरि शिरुनीया मारी हांकाही नामे
कवणहि कुठला तो माहिती त्यास वाडी
धड धड चढुनिया जातसे उंच माडी
घरि घरि शिरुनीया मारी हांकाही नामे
कवणहि कुठला तो माहिती त्यास वाडी
धड धड चढुनिया जातसे उंच माडी
कवी: दा वि फफे
आता बघू कोणा कोणाला ह्या वृत्ताच्या कविता आठवतात ते...
मधुसूदन थत्ते
१९-०५-२०१३
१९-०५-२०१३
==============================================
पोर माहेरी दोन दिवस आली
पोर माहेरी दोन दिवस आली, भुर्रकन गेली. आईच्या मायेत न्हाली, मायेचा शिडकावा आई-बाबांवर पसरून गेली.
दाणापाण्याची सोय बघायला जायला हवे. …..<<पंख फुटले, पिल्ले गेली, पाखरे तिथेच>>…….. इथे पाखरांची उपमा संपते.
मुले मात्र परत येतात. घरट्याची आठवण येते. घरट्यात अमोल आठवणी जपलेल्या, त्यात आई-बाबांचा जिव्हाळा. त्यांना उजाळा द्यायला नको का? आई-बाबांना तरी त्या आठवणींशिवाय वेगळे किती असणार?
एकत्र कुटुंबांचा मागील काळ किती वेगळा!!
आज फक्त वृद्ध आई-बाबा मागे उरतात…. रोजसाठी एकमेकांशिवाय आणखी कोणी असणार? त्यातला एक गेला तर?
आज फक्त वृद्ध आई-बाबा मागे उरतात…. रोजसाठी एकमेकांशिवाय आणखी कोणी असणार? त्यातला एक गेला तर?
पण ही तर आजची जगरहाटी. त्याला सामोरे जाणे भाग आहे. हे चित्र मागील काळी फारसे दिसायचे नाहीं.
मधुसूदन थत्ते
May 17, 2011
================================================
No comments:
Post a Comment