Friday, November 20, 2015

मित्रानो,
आजच्या काळात भगवदगीता का स्मरावी, अभ्यासावी, तिचे मनन का करावे, तिच्यापासून बोध का घ्यावा...ह्या सा-या प्रस्नांचे थोडक्यात आणि समर्पक उत्तर विद्यावाचस्पती श्री शंकर अभ्यंकर यांनी दिले आहे ते इथे उद्घृत करतो आहे:
-------------------------------------------------------------------------
"....गीतेवरील प्रवचने, ग्रंथ, कीर्तने, श्रवण यामागे विशिष्ठ सात्विक हेतू असू शकतो..असलाही पाहिजे. 'मानवाला आत्मोन्नत करून त्याला स्व-रुपाची ओळख करून देणे' हाच तो हेतू.
भ्रष्टाचार, दुराचार, कृत्रिम टंचाई, दारिद्र्य, महागाई, गुंडगिरी, दहशतवाद, नीतिमत्तेचा -हास अशा अनंत राक्षसांनी ही सुंदर वसुंधरा आज नासवून टाकली आहे.
भारतातही ह्या राक्षसांचा स्वैर नाच चालू आहे. देहात्मवादावर उभारलेल्या पराकोटीच्या ढोंगी तत्वज्ञानाने चंगळवाद सर्वत्र पसरविला आहे.
मुले व तरुण त्यामुळे संस्काराला, शाश्वताला पारखे होऊन खोट्या मृगजळामागे धावत आहेत. भोगवादी संस्कृतीची चटक माणसाला लागली आहे.
माणसाच्या रक्ताची चटक लागलेल्या वाघापेक्षाही असा मनुष्य महाभयंकर असतो...."
मधुसूदन थत्ते
जुने २०१२

No comments: